Farmers Protest 
ताज्या बातम्या

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, केंद्र सरकारकडून चर्चेचे निमंत्रण नसल्याने शेतकरी आक्रमक

शेतकऱ्यांचा दिल्लीच्या सीमेवर एल्गार पाहायला मिळाला. केंद्र सरकारकडून चर्चेचे निमंत्रण न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेती उत्पादनांना किमान हमीभाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी पुन्हा दिल्लीकडे निघाले आहेत.

Published by : Team Lokshahi

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार पुकारला आहे. केंद्र सरकारकडून चर्चेचे निमंत्रण नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांचं आंदोलन केंद्र सरकारच्या कृषी धोरणांविरोधात सुरु आहे.

थोडक्यात

  • दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार

  • केंद्र सरकारकडून चर्चेचे निमंत्रण नसल्याने शेतकरी आक्रमक

  • केंद्र सरकराच्या धोरणांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन

शेती उत्पादनांना किमान हमीभावासह विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे पायी निघालेल्या १०१ शेतकऱ्यांना शनिवारी केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आज पुन्हा दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढला आहे. शेतकऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे शेती उत्पादनांना देण्यात येणाऱ्या किमान हमीभावाची कायदेशीर हमी मिळावी.

पंजाबचे शेतकरी नेते सस्वनसिंग पंधेर यांनी शनिवारी सांगितले, "अद्याप केंद्र सरकारकडून चर्चेसाठी कोणताही संदेश आलेला नाही. त्यामुळे शेतकरी आता रविवारी सकाळी दिल्लीच्या दिशेने निघतील. शेतकऱ्यांनी सोबत ट्रॅक्टर किंवा इतर वाहने घेतलेली नाहीत, तरीही त्यांना का अडवले जात आहे?" असा सवाल त्यांनी विचारला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manikrao Kokate : मंत्रिमंडळात खांदेपालट ! माणिकराव कोकाटेंना धक्का; कृषीमंत्रिपदी दत्तात्रय भरणेंची वर्णी ?

Mahadev Munde Case : 'दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही'; अशी मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांची माहिती

Latest Marathi News Update live : मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Rakshabandhan 2025 : महागाई वाढली, पण रक्षाबंधनाचा उत्साह तसाच!