Rajasthan Accident 
ताज्या बातम्या

Rajasthan Accident : राजस्थानमधील दौसा येथे भीषण अपघात; 11 जणांचा मृत्यू

राजस्थानातील दौसा जिल्ह्यात बुधवारी सकाळी घडलेल्या एका भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे.

Published by : Team Lokshahi

(Rajasthan Accident) राजस्थानातील दौसा जिल्ह्यात बुधवारी सकाळी घडलेल्या एका भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. खाटू श्याम मंदिराच्या दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांची पिकअप व्हॅन मनोहरपूर–दौसा महामार्गावर वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकशी जोरदार धडकली.

या अपघातात 7 लहान मुले आणि 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, किमान नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धडकेनंतर पिकअपचा पुढील भाग पूर्णतः चुराडा झाला आणि अनेक प्रवासी आतमध्ये अडकले. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना व रुग्णवाहिकांना कळवले.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले. गंभीर अवस्थेत असलेल्या काहींना जयपूर येथील एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मृतांच्या गावांमध्ये आणि दौसा परिसरात शोककळा पसरली आहे.अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा