ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघात; २९ प्रवासी असलेली बस पूलावरून कोसळली

Published by : shweta walge

जालना - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एका खासगी बसचा भीषण झाला आहे. या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ४ जण गंभीर जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. हा अपघात काल मध्यरात्रीच्या सुमारास झाला आहे.

पुण्याहून नागपूरकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्स जालन्यातील मात्रेवाडी येथील एका लहान पुलावर आली. तेवढ्यात मागून येणाऱ्या एका वाहानाला साईड देण्यासाठी चालकानं बस पुलाच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. पण याच प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस थेट पुलावरुन खाली कोसळली. बस पुलावरून 7 ते 8 फूट खाली कोसळली. मात्र, या भीषण अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त बस पूजा ट्रॅव्हल्स कंपनीची असल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच बदनापूर व जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये २५ प्रवाशी जखमी झाले असून ४ जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...