ताज्या बातम्या

अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या निवासस्थानी ‘एफबीआय’चे छापे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील खासगी क्लब आणि ‘पाम बीच’ येथील निवासस्थानावर अमेरिकन तपास यंत्रणा ‘फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन्स’ने (एफबीआय) छापे टाकले आहेत. या छाप्यामुळे ट्रम्प संतप्त झाले असून २०२४ मध्ये पुन्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी अडथळे आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

वृत्तांनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये व्हाईट हाऊस सोडताना गोपनीय कागदपत्रे-दस्तावेज सोबत फ्लोरिडातील मार-ए-लागो येथील आपल्या निवासस्थानी नेले असल्यांचा आरोप आहे. यासंदर्भात एफबीआयने छापेमारी केली आहे. यावर अमेरिकेचा विधी विभाग आणि एफबीआयने तूर्तास प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

तर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनाही डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर छापा टाकल्याची माहिती देण्यात आली नव्हती, असा दावा व्हाईट हाऊसने केला आहे. व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, न्याय विभाग या प्रकरणात स्वतंत्रपणे काम करत आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर छापा टाकण्यासंबंधी विभागाकडून बिडेन यांना कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती.

डोनाल्ड ट्रम्प एफबीआयच्या कारवाईने संतप्त झाले असून त्यांनी एक निवेदन जारी केले आहे. एफबीआय अधिकाऱ्यांनी पाम बीचवर असलेल्या मार-ए-लागोवर छापा टाकून ते ताब्यात घेतले आहे. आपल्या देशासाठी ही काळाची वेळ आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. न्याय व्यवस्थेचा शस्त्र म्हणून गैरवापर केला जात आहे, असा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

न्याय विभाग ट्रम्प यांच्याविरुद्ध दोन प्रकरणांची चौकशी करत आहे. 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उलटवण्याच्या प्रयत्नाशी संबंधित पहिले प्रकरण आणि कागदपत्रे हाताळण्यासंदर्भात दुसरे प्रकरण. एप्रिल-मे महिन्यातही तपास यंत्रणेने याप्रकरणी ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील जवळच्या मित्रांची चौकशी केली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये व्हाईट हाऊस सोडताना गोपनीय कागदपत्रे-दस्तावेज सोबत फ्लोरिडातील मार-ए-लागो येथील आपल्या निवासस्थानी नेले होते. एफबीआयने आपल्या छाप्यादरम्यान येथील १५ पेट्यांत ठेवलेल्या या कागदपत्रांचा शोध घेतला. यातील काही दस्तावेजांवर राष्ट्रीय अभिलेखागारातर्फे गोपनीय दस्तावेजाची शिक्का लावण्यात आलेली आहे. अमेरिकेचा विधी विभाग आणि एफबीआयने या छापेमारीवर तूर्तास प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?

टी-२० वर्ल्डकपआधी भारताच्या अडचणी वाढल्या, कर्णधार रोहित शर्माला दुखापत, 'या' खेळाडूनं दिली मोठी अपडेट

"४ जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार"; रत्नागिरी-चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली 'मशाल'

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, म्हणाले...