Guru Purnima 2025: या वर्षी गुरुपौर्णिमा 9 जुलै रोजी बुधवारी साजरी केली जात आहे. गुरु पौर्णिमा हा एक महत्त्वाचा सण आहे, जो गुरुंची उपासना करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी समर्पित आहे. हा सण आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात. तुम्ही तुमच्या जीवनातील गुरुंना मेसेज, सोशल मीडिया स्टेटसद्वारे शुभेच्छा द्या...
गुरु म्हणजे आहे काशी
साती तीर्थ तया पाशी
तुका म्हणा ऐंसे गुरु
चरण त्याचे हृदयी धरू
गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!
गुरुविना मति नाही,
गुरु विना गती नाही,
गुरुविना आपले अस्तित्व नाही
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!
तुमच्यासारखे गुरु आम्हास लाभले
हे आमचे भाग्य,
जीवनात दाखवला मार्ग तुम्ही
शिष्य होणे तुमचे
हे आमचे सौभाग्य...!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्ग दाखवता तुम्ही
जेव्हा काय करावे काहीही समजत नाही
तेव्हा आठवता तुम्ही
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!
आपले आईबाबा,शिक्षक,मित्र
आयुष्यात वाट दाखवणारे सर्व
अशा प्रत्येक व्यक्तीला
जो काही ना काही शिकवतो,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!