BMC Election BMC Election
ताज्या बातम्या

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू, पक्षांची तयारी जोमात

नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापालिका निवडणुकांची धांदल सुरू झाली आहे.

Published by : Riddhi Vanne

नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापालिका निवडणुकांची धांदल सुरू झाली आहे. सर्व पक्ष महापालिका निवडणुकीसाठी तयारी करत असून, आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 23 डिसेंबरपासून 29 डिसेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज दाखल केले जाऊ शकतात. 25 आणि 28 डिसेंबर या सुटीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे महापालिकेने सांगितले आहे.

31 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची तपासणी करून, योग्य उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. 2 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 3 जानेवारीला उमेदवारांना निवडणूक चिन्हे दिली जातील आणि त्याच दिवशी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल.

पक्ष कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही सर्व पक्षांसाठी महत्त्वाची मानली जात आहे, त्यामुळे उमेदवार निवडीसाठी प्रत्येक पक्ष जास्त काळजीपूर्वक विचार करत आहे. प्रत्येक वॉर्डात लढण्यासाठी अनेक इच्छुक आहेत, पण फक्त जिंकण्याची खात्री असलेल्या उमेदवारालाच तिकीट दिले जाईल, असे पक्षांचे मत आहे.

थोडक्यात

  • नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापालिका निवडणुकांची धांदल सुरू झाली आहे.

  • सर्व पक्ष महापालिका निवडणुकीसाठी तयारी करत असून,

  • आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा