ताज्या बातम्या

Union Budget 2024: आंध्र प्रदेश, बिहारबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या 'या' मोठ्या घोषणा

मोदी 3.0 सरकारचं आज पहिलं बजेट मांडण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर केला.

Published by : Dhanshree Shintre

मोदी 3.0 सरकारचं आज पहिलं बजेट मांडण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर केला. अर्थमंत्री सीतारामन यांनी सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाही सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. रोजगार, शेती त्यासोबतच उद्योग या क्षेत्रांसाठीही घोषणा जाहीर केल्या आहेत. या अर्थसंकल्पात आंध्रप्रदेशासह बिहारला देखील मोठा निधी देण्याची घोषणा केली आहे. शिवाय वेगवेगळ्या योजनाही या दोन राज्यात राबवल्या जाणार आहेत.

आंध्र प्रदेशला 15 हजार कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. या शिवाय आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच्या विकासासाठीही मोठा निधी दिला जाईल असे सीतारमण यांनी स्पष्ट केले आहे. आंध्र प्रदेशला या अर्थ संकल्पात विशेष महत्व दिले गेले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. तर नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारसाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी दोन्ही राज्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.  बिहारमध्ये मेडिकल कॉलेज स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा आंध्र प्रदेशलाही फायदा झाला आहे. कारण अर्थमंत्र्यांनी राज्याची भांडवलाची गरज ओळखून राज्याला विशेष आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्याची भांडवलाची गरज ओळखून, आम्ही बहुपक्षीय एजन्सीद्वारे विशेष आर्थिक सहाय्य प्रदान करू, असं यावेळी सीतारामन यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षात तसेच भविष्यातील वर्षांमध्ये अतिरिक्त रकमेसह 15,000 कोटी रुपयांची व्यवस्था केली जाईल, असंही यावेळी निर्मला सीतारामन यांनी नमूद केलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच