संजय राठोड, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यात सातत्याने शेतकरी आत्महत्या होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. विदर्भात प्रथम दारव्हा तालुक्यातील जवळा येथील प्रगतीशील शेतकर्याने ऑर्कीड फुल शेतीतून आर्थिक उन्नती केली आहे.
विशेष म्हणजे (थायलंड) येथून रोपटे आणून नारळाच्या सेलमध्ये सॉईल लेस त्याची लागवड केली. त्या ऑर्कीड रोपट्याला आता फुल आले असून, त्याला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. पहिल्याच वर्षी आठ ते नऊ लाख रुपये उत्पन्न होण्याची आशा शेतकर्याने व्यक्त केली आहे.