Dilip Walse Patil  Team Lokshahi
ताज्या बातम्या

केतकी चितळेवर ठिकठिकाणी गुन्हे दाखल, आता गृहमंत्री म्हणाले...

आता पुणे, ठाणे, गोरेगावात गुन्हा दाखल

Published by : Team Lokshahi

अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही नेहमीच सोशल मीडियावरील (social media)आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असते. अभिनेत्री यापुर्वीही अनेकदा वादग्रस्त विषयावर भाष्य करुन टीकेची धनी ठरली होती. आता पुन्हा एकदा शरद पवार यांना (sharad pawar)उद्देशून शेअर केलेल्या मजकूरवरुन कळवानंतर पुण्यात आणि गोरेगावमध्ये तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हे सगळं ठरवून आणि जाणूनबूजून केलं जात. यावर कारवाई होणार असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची FaceBook व इतर समाज माध्यमातून बदनामी करणाऱ्या केतकी चितळे व जीवे मारण्याच्या धमकी सदृश लिखाण करणाऱ्या निखिल भांबरे विरुध्द मुंबई प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबई येथील गोरेगाव पोलीस ठाण्यात १४ मे २०२२ रोजी तक्रार देण्यात आली. त्यावरुन तिच्यावर भादवि 153,500,501,506(2),505,504,34 नुसार गुन्हा दाखल.

पुण्यात गुन्हा दाखल

मराठी अभिनेत्री केतकी चितळे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. यंदा तिनं थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेसबुकवर अक्षेपार्ह पोस्ट केली आहे . या प्रकरणी केतकीविरोधात ठाण्यात आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान केतकी चितळे हिचा बोलविता धनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केली आहे. केतकी चितळे च्या वक्तव्याला फारस महत्व देण्याची गरज नाही त्या सोबत तिच्यावर कडक कारवाई देखील केली पाहिजे अशी मागणी विद्या चव्हाण यांनी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा