मुंबईतील टोलेजंग वन अविघ्न पार्कला पुन्हा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 35व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. आगीमध्ये अनेकजण अडकल्याची माहिती मिळत आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
वन अविघ्न मुंबईतील लालबाग परिसारातील गगनचुंबी इमारत. ही इमारत एकूण 60 मजल्यांची आहे. तर इमारतीच्या आजूबाजूला इतर लहान-मोठ्या इमारतीही आहेत. त्याशिवाय अनेक बैठी घरं, चाळीही आहेत. मध्य रेल्वेवरील करी रोड स्टेशनच्या अगदी बाजूलाच ही इमारत आहे.