भूपेश बारंगे|वर्धा: वर्ध्यातील प्रशासकीय भवनातील पहिल्या माळ्याच्या आरटीओ कार्यालयाच्या एका रूमला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. खिडकीतून धूर व आगीचे लोट बाहेर निघत असल्याने नागरिकांचे लक्ष पडले. आगीने रौद्ररूप घेता खिडकीतून आगीचे लोट बाहेर पडताना दिसत होते. आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याची प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
आज शासकीय सुट्टी असल्यामुळे आरटीओ कार्यालय बंद होते. त्यामुळे मात्र कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी आरटीओ कार्यालयातीलदस्तावेज जळल्याची माहिती समोर येत आहे. आरटीओ कार्यालयात आग लागल्याची कळताच नगरपालिकाचे अग्निशमन दल पाचारण करण्यात आले. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.
आग कशाप्रकारे लागली याची माहिती कळू शकली नसली तरी शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आरटीओ कार्यलयाच्या एका रूमला आग लागल्याने शासकीय दस्तावेज जळल्याचे समजते.आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक प्रयत्न करत असून आग आटोक्यात आणण्यासाठी वरच्या मजल्यावर निशाणी लावून आग विझवण्यात येत आहे.आगीने रौद्ररूप धारण केल्याने दूरपर्यंत आगीचे लोट दिसून येत होते. आजूबाजूच्या कार्यालयात मात्र आग पसरली नसल्याचे सांगण्यात येत आहे.