महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील ईडी कार्यालयात रविवारी पहाटे आग लागली. एजन्सीनुसार, दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरातील कैसर-ए-हिंद इमारतीत भीषण आग लागल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. ईडीचे कार्यालयही याच इमारतीत आहे.
मुंबईचे ईडी कार्यालय म्हटल्यावर भल्याभल्यांना घाम फुटतो. मात्र शरद पवारांपासुन राज ठाकरेंपर्यंतच्या बड्या नेत्यांना समन्स पाठवणाऱ्या याच कार्यालयात मध्यरात्री अडीच वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहाहून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. तथापि, यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही. तब्बल सहा तासानंतर ही आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न मुंबई अग्निशमन दलाकडून सुरू आहेत.