थोडक्यात
नवी मुंबईत एका दिवसात तिसरी मोठी आगीची दुर्घटना
तुर्भेमध्ये फटाक्यांमुळे घरामध्ये लागली आग
वाशी , कामोठेनंतर आता तुर्भेमध्येही अग्नितांडव
घरात ठेवलेल्या फटाक्यांमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती
नवी मुंबईत मंगळवारी एका दिवसात तिसऱ्यांदा मोठ्या आगीची घटना घडली आहे. तुर्भे परिसरातील एका घरात ठेवलेल्या फटाक्यांमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
आग लागल्यानंतर घरात ठेवलेले दोन गॅस सिलिंडर स्फोट झाल्याने आगीने भयंकर रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. तर सध्या आग नियंत्रणात आली असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
तर प्राथमिक माहितीनुसार, दिवाळीपूर्वी घरात फटाके साठवून ठेवले असल्याने आग लागली असल्याचं प्राथमिक अंदाज आहे.