ताज्या बातम्या

Chembur: मुंबईतील चेंबूर (पूर्व) येथील सिद्धार्थ कॉलनीमध्ये अग्नितांडव

मुंबईच्या चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीत अग्नितांडव झाला आहे. दोन मजली रहिवासी इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Published by : Dhanshree Shintre

मुंबईच्या चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीत अग्नितांडव झाला आहे. दोन मजली रहिवासी इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दुकानातील आग वरच्या मजल्यावरील घरात पोहोचली असल्याची माहिती मिळाली आहे. आगीत होरपळून 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पहाटे 5 च्या सुमारास आग लागल्याची माहिती आहे.अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. आग विझवण्याचे काम सुरू आहे. या मध्ये एका 7 वर्षीय मुलीचा आणि 10 वर्षीय मुलाचा समावेश आहे. चेंबूर पूर्वेतील सिद्धार्थ कॉलनी येथे रविवारी पहाटे 5:20 वाजता एका दुकानाला लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. ग्राउंड प्लस एक मजली इमारतीमध्ये आग लागली होती ज्याचा तळमजला दुकान म्हणून आणि वरचा मजला निवासी म्हणून वापरला जात होता.

मृतांमध्ये 30 वर्षीय प्रेम गुप्ता, 30 वर्षीय मंजू प्रेम गुप्ता, 39 वर्षीय अनिता गुप्ता, 10 वर्षीय निष्पाप नरेंद्र गुप्ता आणि 7 वर्षीय मुलगी पॅरिस गुप्ता यांचा समावेश आहे. सर्वांना वाचवून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी पाचही जणांना मृत घोषित केले. रुग्णालयाकडून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच