अहिल्यानगर येथील बीड रोडवर एक भयानक असा अपघात घडला. अहिल्यानगर येथे बीडकडून जामखेडच्या दिशेने आलेली अर्टिगा कार ही राऊत मैदानाजवळ कावेरी हॉटेलजवळील डिव्हायडरला म्हणजेच दुभाजकाला धडकली आणि धडकल्यानंतर कारमधलं सीएनजी गॅसने पेट घेतला ज्यामुळे कारमध्येच आगीचा भडका उडला.
आग एवढी भीषण आणि रौद्ररुपी होती की त्यात दोन जणांचा जळून अक्षरशः कोळसा झाला. या मृतांमध्ये 28 वर्षीय महादेव दत्ताराम काळे आणि 35 वर्षीय धनंजय नरेश गुडवाल या दोघांचा समावेश होता. तसेच यातील एक पोलीस कर्मचारी असल्याचं म्हटलं जात आहे. गुडवाल हे जामखेड पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल होते. यानंतर फायर ब्रिगेडच्या सहाय्याने आग विझवण्याच्या प्रयत्नाना यश आले,
मात्र तोपर्यंत आगीच्या भडक्यात दोघांचा जळून मृत्यू झाला होता. ही दुर्दैवी घटना आज, म्हणजेच 24 फेब्रुवारीला पहाटे 4 च्या सुमारास घडली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.