थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Breaking News ) आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून ऐन निवडणुकांच्या काळात कार्यालयावर 4 राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबाराची सर्व घटना CCTV कॅमेरात कैद झाली आहे.
रात्री 12च्या सुमारास दोन अज्ञात बाईकस्वारांनी येत हा गोळीबार केला. पश्चिम भागातील शंकर मंदिर परिसरात भाजप उमेदवार पवन वाळेकर यांचं कार्यालय आहे. गोळीबाराची घटना घडल्यानंतर वाळेकर यांच्या कार्यालयातून त्यांच्या सुरक्षारक्षक बाहेर आला मात्र त्याच्या दिशेने या अज्ञातांनी गोळीबार केला.
या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र सुरक्षा रक्षक जखमी झाला. भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर झालेल्या या गोळीबारामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
Summery
अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
ऐन निवडणुकांच्या काळात कार्यालयावर 4 राऊंड फायर
गोळीबाराची घटना CCTV कॅमेरात कैद