Kapil Sharma : 'या' कॉमेडीयनच्या कॅनडामधील कॅफेमध्ये गोळीबार; गाडीच्या आतून गोळ्या झाडल्या अन्...  Kapil Sharma : 'या' कॉमेडीयनच्या कॅनडामधील कॅफेमध्ये गोळीबार; गाडीच्या आतून गोळ्या झाडल्या अन्...
ताज्या बातम्या

Kapil Sharma : 'या' कॉमेडीयनच्या कॅनडामधील कॅफेमध्ये गोळीबार; गाडीच्या आतून गोळ्या झाडल्या अन्...

कपील शर्माने कॅनडामध्ये नवीन रेस्टोरेंट उघडले होते. त्या रेस्टॉरंटचे नाव त्याने 'कॅप्स कॅफे' दिले होते. काल रात्री म्हणजेच बुधवारी रात्री ब्रिटिश कोलंबियातील सरे येथे गोळीबार झाला.

Published by : Riddhi Vanne

Kapil Sharma's Canada Café Targeted in Shooting Incident : सिनेसृष्टीमध्ये आपल्या विनोदाची छाप पाडणारे कपील शर्माने कॅनडामध्ये नवीन रेस्टोरेंट उघडले होते. त्या रेस्टॉरंटचे नाव त्याने 'कॅप्स कॅफे' दिले होते. काल रात्री म्हणजेच बुधवारी रात्री ब्रिटिश कोलंबियातील सरे येथे गोळीबार झाला. कॅफेमध्ये एकाच अनेक वारंवार गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी परिसराला वेढा घातला आहे. गोळाबार नेमका कोणी केला? त्याबद्दल पोलिस चौकशी करत आहेत. आतापर्यंत कोणीही जखमी नसल्याची प्राथमिक माहित मिळत आहे.

कपिल शर्मा हा भारतीतल आणि परदेशातील त्याच्या लोकप्रिय कॉमेडी शोसाठी प्रसिद्ध आहे . आपल्या चाहत्यांसाठी त्याने काही दिवसांपूर्वी केएपी'एस कॅफेन असे रेस्टोरेंट सुरु केले होते. कॅनडामधील भारतीयांसाठी एक प्रसिद्ध हँगआउट स्पॉट बनत आहे. शनिवारीच या कॅफेचे सॉफ्ट लॉन्च झाले होते, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. काल रात्री कपील शर्माच्या रेस्टोरेंटमध्ये गोळीबार झाला आहे. याबाबत कपिल शर्माने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) चा संशयित कार्यकर्ता आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) यादीतील दहशतवाद्यांपैकी एक हरजीत सिंग लाडी याने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. कपिल शर्माच्या आक्षेपार्ह टिप्पण्यांमुळे त्याने हा हल्ला केल्याचे लाडीने म्हटले आहे, जरी या टिप्पण्यांची पुष्टी झालेली नाही.

कपिल आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांनी इंस्टाग्रामवर उद्घाटनाचे अनेक सोशलमीडियावर फोटो शेअर केले होते. त्या फोटोंना चाहत्यांनी आणि मित्रांनी भरभरुन प्रेम दिले होते. त्याबद्दल कपिलने आभार मानले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Accident : नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Latest Marathi News Update live : बच्चू कडू यांच्या 'सात बारा कोरा' यात्रेचा आज पाचवा दिवस

Latest Marathi News Update live : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंदाश्रमात दाखल

आजचा सुविचार