थोडक्यात
पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोंढवा परिसरात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे.
गणेश काळे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढवा परिसरात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. गणेश काळे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबार झाला. कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात गुन्हेगाराकडून हा गोळीबार करण्यात आला. गणेश काळे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाच नाव असून गणेश काळे हा आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गणेश काळे याचा भाऊ दत्ता काळे हा आंदेकर टोळीतील नंबरकारी असून आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी होता.
खून झालेला गणेश काळे हा समीर काळे याचा भाऊ आहे. समीर हा सोमा गायकवाड टोळीतील सदस्य आहे. गणेश काळेवर सहा राऊंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून त्याच्यावर कोयत्याने देखील वार करण्यात आले आहेत. याच समीर काळे याने वनराज आंदेकरच्या खुनात वापरलेली पिस्तुले समीर काळे याने ही पिस्तुले मध्य प्रदेशातून आणली होती. समीर हा सध्या कारागृहात आहे. त्याचा भाऊ गणेश याचा खून करण्यात आला आहे.