ताज्या बातम्या

Pune : किरकोळ कारणावरून पुण्यात गोळीबार; हल्ल्यात एक तरुण जखमी

किरकोळ कारणावरून पुण्यात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

किरकोळ कारणावरून पुण्यात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील बाणेर परिसरात तरुणांवर हा गोळीबार झाला आहे. या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला असून निलेश पिंपळकर असे फिर्यादीचे नाव आहे. चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आदित्य रणावरे आणि सागर बनसोडे असे आरोपींचे नाव असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. हा सगळा प्रकार पुण्यातील बाणेर भागात असलेल्या महाबळेश्वर हॉटेल जवळ घडला. पोलिसांना घटनास्थळावरून गावठी कट्ट्याचा १ जिवंत राऊंड आणि २ केसेस जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश आणि रोहीत हे दोघे ही एकाच भागात राहायला असून एका मोटर कंपनीमध्ये ते काम करतात. रोहित याला कंपनी मधुन कामावरुन काढुन टाकले. या गैरसमजुतीतून रोहितने फिर्यादी याला महाबळेश्वर हॉटेल समोरील ४५ अव्हेन्युव बिल्डींग जवळ बाणेरकडे जाणारे रोड लगत भेटण्यास बोलवून घेतलं.

फिर्यादी हे त्यांचं मित्र आकाश बाणेकार आणि रोहित हे बोलत असताना त्या ठिकाणी आरोपी आदित्य दिपक रणावरे, सागर लक्ष्मण बनसोडे यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन बंदुकीतून गोळीबार केला. हे आरोपी रोहित चे मित्र होते. या हल्ल्यात फिर्यादी यांचा मित्र आकाश बाणेकर याच्या उजव्या पायांच्या मांडीला लागून तो गंभीर जखमी झाला. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 PAK vs UAE : पाकिस्तानी क्रिकेट टीम आशिया चषकातून बाहेर? PAK vs UAE सामना रद्द होण्याच्या चर्चांनंतर खळबळ

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडणार! एकाच वेळी संपूर्ण घर नॉमिनेट करण्याची वेळ का आली?

Uddhav Thackeray On Meenatai Statue : "हे करणारे दोनचं व्यक्ती असू शकतात" मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रकार, उद्धव ठाकरेंचा निशाणा कोणाकडे?

Uddhav Thackeray On Narendra Modi : “मोदी हे आपले शत्रू नाहीत, पण ते..." पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत उद्धव ठाकरेंनी केलं मोठ वक्तव्य