ताज्या बातम्या

Salman Khan: मोठी बातमी! अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे.

Published by : Dhanshree Shintre

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. 2 अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आले होते. पहाटे 4.55 वाजता ही घटना घडली. दोन अज्ञांताकडून चार राऊंड फायर झाल्याची माहिती प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

गोळीबार झाल्यानंतर हल्लेखोर पसार झाले असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात हेल्मेट घालून दुचाकीवर गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ दाखल झाले होते. सलमान खान याला कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगने याआधी अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान क्राइम ब्रांचची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

सलमान खानसोबत नेहमी पोलिस आणि सुरक्षा रक्षकांचा ताफा असतो. गोळीबार कोणी केला? याचा तपास मुंबई पोलिसांकडून केला दात आहे. घटनास्थळी विविध पोलिसांची पथके या घटनेचा तपास करता आहे. त्यात महत्त्वाचे असणारे सीसीटीव्ही डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि अज्ञातांचा तपास सुरू आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा