Afreen Shah 
ताज्या बातम्या

Kurla Bus Accident: नोकरीचा पहिला दिवस तिच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला!

कुर्ला येथे बेस्ट बस अपघातात १९ वर्षीय आफरीन शाहचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नोकरीच्या पहिलाच दिवस शेवटचा दिवस ठरला आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

Published by : Gayatri Pisekar

मुंबईतील कुर्ला येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या भरधाव बेस्टच्या बसने अनेक वाहने आणि रस्त्यांवरुन चालणाऱ्या लोकांना चिरडलं. या भीषण अपघातात ६ लोकांचा मृत्यू झाला. तर ४९ लोक जखमी झाले. या अपघाताने मुंबई हादरली.

बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये १९ वर्षीय आफरीन शाह या तरुणीचाही मृत्यू झाला आहे. आफरीनच्या आयुष्यात तिच्या नोकरीचा पहिला दिवस तिच्यासाठी शेवटचा दिवस ठरला. सोमवारचा ९ डिसेंबरची रात्र तिच्यासाठी काळरात्र ठरली.

नेमकं काय घडलं?

आफरीन नोकरीचा पहिलाच दिवस असल्याने सकाळीच घरातून निघाली होती. मात्र, रात्र झाली तरी आफरीन घरी पोहचलीच नाही. नोकरीचा पहिला दिवस असल्यामुळे तिच्या घरातील सगळेच आनंदात होते. मात्र, हा तिच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरेल याची कोणालाही कल्पना नव्हती. उपलब्ध माहितीनुसार, आफरीन शाह आपला ऑफिसातील पहिला दिवस संपवून घरी जायला निघाली होती.

आफरिन घरी जायला निघाली असताना काळाचा घाला

आफरिनचे काका मोहम्मद युसूफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आफरीन ऑफिसवरुन निघून कुर्ला रेल्वे स्टेशनला पोहोचली. मात्र, तिला घरी जाण्यासाठी रिक्षा मिळत नव्हती. म्हणून तिने वडिलांना फोन केला आणि कोणी घ्यायला येईल का ही विचारणा केली. तिला घ्यायला कोणी येऊ शकणार नसल्याने तिच्या वडिलांनी तिला चालत येण्याचा सल्ला दिला.

आफरिनचे नातेवाईक अब्दुल राशिद शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते एकत्र कुटुंबात राहतात. गाडी चालवणारं कोणी घरी नव्हतं म्हणून तिला वडिलांनी चालत यायचा सल्ला दिला होता.

सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घटनास्थळावर आफरीनचा फोन मिळाला. त्या व्यक्तीने आफरीनच्या फोनमध्ये शेवटचा नंबरवर रिडाईल केलं. शेवटचा नंबर हा आफरीनच्या वडिलांचा होता. त्या नंबरवर कॉल करत सदर घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच आफरीनचे नातेवाईक तात्काळ रुग्णालयात पोहोचले. पण आफरीनच्या डोक्यावर, चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्याने त्यातच तिचा मृत्यू झाला होता. आफरिनचे कुटुंबीयांना तिच्या मृत्यूची बामती कळताच धक्काच बसला. आफरिनच्या मृत्यूच्या बातमीनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली