ताज्या बातम्या

Chhagan bhujbal : "पहिल्यांदा शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे, शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही जगणार"

सध्या महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी सरकारतर्फे अनेक मुद्दे मांडले आहेत. भुजबळ म्हणाले की, सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. नद्या नाल्यांना पूर येत आहे. ते पाणी नागरिकांच्या घरात घुसत असून त्यांचे संसार रस्तावर आले आहेत.

Published by : Team Lokshahi

लोकशाही मराठीच्या व्यासपीठवर आज "उत्तर महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले आहे. लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे आणि दीपक बिल्डर अ‍ॅंड डेवलपर्स प्रस्तुत या कार्यक्रमाला आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि उत्तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी राजकीय नेत्यांची ध्येयधोरणे काय असतील? यावर सविस्तर माहिती या कार्यक्रमात मांडली जाणार आहे. तसेच महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दल चर्चा केली जाणार आहे. याचपार्श्वभूमिवर या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली आणि छगन भुजबळ यांची मुलाखत घेण्यात आली, यावेळी त्यांना अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई सरकार कशी देणार आहे ? प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की,.......

सध्या महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारतर्फे अनेक मुद्दे मांडले आहेत. भुजबळ म्हणाले की, "सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. नद्या नाल्यांना पूर येत आहे. ते पाणी नागरिकांच्या घरात घुसत असून त्यांचे संसार रस्तावर आले आहेत. शेतकर्‍यांच्या शेती साफ झाली आहे. सरकारसाठी राज्याचा विकास महत्त्वाचा पण शेतकर्‍यांना सर्व प्रथम मदत करणे आहेत सरकारसाठी शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही जगणार आहोत. आणि तेव्हाच विकास करणे शक्य होईल. सध्या सरकारचं लक्ष हे शेतकर्‍यांना कशी मदत करता येईल याकडे लागले आहे. सर्वच मंत्र्यांना या परिस्थतीकडे प्रथम लक्ष देणं गरजेचं आहे. "

"मी अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री असल्यामुळे मी त्वरित धान्याची वाटप करणं सुरु केलं. अशा प्रकारे सर्वच खात्यांचा मंत्र्यांना त्वरित कामाला लागणं गरजेचं आहे. यासाठी लागणारा निधी कशा प्रकारे लवकरात लवकर जमा करता येईल आणि तो नागरिकांना कसा देता येईल याकरिता सर्वे कामाला लागले आहेत. आपण केंद्रकडे मदतीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rahul Gandhi : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर येणार

Weather update : पुढील 48 तास पावसाचा जोर कायम! 'या' 17 जिल्ह्यांना हायअलर्ट, सरकारकडून Helpline नंबर जारी

ग्रीन टी विरुद्ध ब्लॅक टी कोणती चांगली ? जाणून घ्या...

Nashik Simhastha Kumbh Mela | Lokshahi Marathi Sanwad 2025 : "...तर हा कुंभमेळा खूप उत्तम होईल" सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत महत्त्वाची माहिती; काय म्हणाले महंत?