Facial Hair Removal : पहिल्यांदाच चेहऱ्यावरील केस काढताय? लक्षात ठेवा ‘या’ 5 महत्त्वाच्या गोष्टी Facial Hair Removal : पहिल्यांदाच चेहऱ्यावरील केस काढताय? लक्षात ठेवा ‘या’ 5 महत्त्वाच्या गोष्टी
ताज्या बातम्या

Facial Hair Removal : चेहऱ्यावरील केस काढताय? लक्षात ठेवा ‘या’ 5 महत्त्वाच्या गोष्टी

सुरक्षित फेशियल हेअर रिमूव्हल: स्वच्छ साधनं वापरून त्वचेची काळजी घ्या, मॉइश्चरायझर लावा.

Published by : Riddhi Vanne

First Time Facial Hair Removal, Important Tips For Women : सौंदर्याची काळजी घेताना चेहऱ्यावरील नको असलेले केस हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. अनेक महिला हे केस पार्लरमध्ये जाऊन काढतात, तर काहीजणी घरीच फेशियल रेझर किंवा वॅक्सचा वापर करतात. मात्र, जर तुम्ही पहिल्यांदाच चेहऱ्यावरील केस काढणार असाल, तर काही गोष्टींचं भान राखणं खूप गरजेचं आहे. अन्यथा यामुळे त्वचेवर पुरळ, मुरुमं, किंवा अ‍ॅलर्जी सारख्या त्रासदायक समस्या होऊ शकतात.

तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून घ्या

प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. कोरडी, तेलकट किंवा संवेदनशील. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल, तर रेझर किंवा वॅक्सिंगमुळे जळजळ किंवा अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे केस काढण्यापूर्वी त्वचेचा प्रकार ओळखणे अत्यावश्यक आहे.

चेहरा स्वच्छ करून घ्या

केस काढण्यापूर्वी सौम्य फेसवॉशने चेहरा नीट धुऊन घ्या. त्वचेतील घाण आणि तेल हटवल्यामुळे छिद्र बंद होणार नाहीत आणि संसर्गाचा धोका कमी होतो. यानंतर हलकं जेल किंवा मॉइश्चरायझर वापरायला विसरू नका.

स्वच्छ आणि सुरक्षित साधनांचा वापर करा

रेझर, एपिलेटर किंवा वॅक्स जे काही वापरत असाल, ते स्वच्छ, नवीन आणि सुरक्षित असावं. गंजलेले किंवा जुने ब्लेड वापरल्यास कट्स आणि इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. वॅक्स वापरताना त्याचे तापमान योग्य आहे का, हेही तपासा.

मॉइश्चरायझरचा वापर आवश्यक

केस काढल्यानंतर त्वचा थोडी संवेदनशील होते, त्यामुळे हलकं, सुगंधरहित मॉइश्चरायझर लावा. यामुळे जळजळ होणार नाही आणि त्वचेला थंडावा मिळतो. केस काढल्यानंतर किमान 6 ते 8 तास मेकअप टाळावा.

उन्हापासून संरक्षण करा

केस काढल्यानंतर त्वचा अधिक संवेदनशील होते, त्यामुळे थेट सूर्यप्रकाशात जाणं टाळा किंवा सनस्क्रीनचा वापर करा. तसेच, वारंवार केस काढणं टाळा – यामुळे त्वचा पातळ होण्याची शक्यता असते. 15 ते 20 दिवसांच्या अंतराने ही प्रक्रिया करणं योग्य ठरतं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?