ताज्या बातम्या

Fitness Trackers : यादीत Samsung Galaxy Fit 3 चा सर्वोत्तम पर्याय; तर Garmin, Amazfit आणि Fitbit ट्रॅकर्सलाही ग्राहकांची पसंती

Android युजर्ससाठी सध्या उपलब्ध असलेल्या फिटनेस ट्रॅकर्समध्ये Samsung Galaxy Fit 3 हे एक हलके, आरामदायक आणि बजेटमधले उपकरण म्हणून वेगाने लोकप्रिय ठरत आहे.

Published by : Team Lokshahi

Android युजर्ससाठी सध्या उपलब्ध असलेल्या फिटनेस ट्रॅकर्समध्ये Samsung Galaxy Fit 3 हे एक हलके, आरामदायक आणि बजेटमधले उपकरण म्हणून वेगाने लोकप्रिय ठरत आहे. हा ट्रॅकर अनेक वैशिष्ट्यांसह सुसज्ज असून, अनेकांनी याला Fitbit Inspire 3 चा प्रभावी पर्याय मानले आहे. फिटनेस व वेलनेस क्षेत्रातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या विविध ब्रँड्समध्ये Garmin, Amazfit आणि Fitbit यांचा समावेश असून, प्रत्येक ब्रँडच्या ट्रॅकर्सना विशिष्ट प्रकारचे युजर्स पसंती देत आहेत.

Fitbit Charge 6 हा स्मार्ट फीचर्स, ऑनबोर्ड GPS, अचूक ट्रॅकिंग व सहज परिधान करता येण्याजोग्या डिझाइनमुळे सर्वसामान्य युजर्ससाठी प्रभावी पर्याय मानला जातो. यामध्ये हार्ट रेट मॉनिटरिंगपासून ते झोपेच्या सवयींवर बारकाईने लक्ष ठेवणारे टूल्सही उपलब्ध आहेत. यामध्ये 10 दिवसांची बॅटरी, AMOLED टचस्क्रीन व विविध आरोग्य मोजमाप सुविधांसह येतो. हाच ट्रॅकर सध्या ‘बजेट Fitbit’ म्हणून ओळखला जातो.

Amazfit Band 7 हा स्वस्त, पण कार्यक्षम ट्रॅकर आहे. कमी किमतीत देखील यामध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, झोप ट्रॅकिंग आणि Alexa सपोर्ट यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे Amazfit Active 2 या स्मार्टवॉचमध्ये 160 पेक्षा अधिक वर्कआउट मोड्स, GPS व ऑफलाइन मॅप्सचा सपोर्ट असल्याने बजेट युजर्समध्ये लोकप्रिय ठरतो आहे.

Garmin Vivoactive 6 हा प्रगत युजर्ससाठी एक आदर्श पर्याय आहे. हे डिव्हाइस फिटनेस, ट्रेनिंग व वेलनेससाठी आवश्यक असलेली सर्व आधुनिक टूल्ससह सुसज्ज आहे. त्याचबरोबर स्मार्टवॉचसारखे फिचर्स, उत्तम बॅटरी बॅकअप आणि आरामदायक डिझाइन देखील देतो.

विशेष म्हणजे, Samsung Galaxy Fit 3 हे Android वापरकर्त्यांसाठी Inspire 3 चा एक परवडणारा पर्याय आहे. अधिक फीचर्स, कमी किंमत आणि स्लिम प्रोफाइलमुळे, हा बँड-शैलीतील ट्रॅकर नव्या युजर्ससाठी आकर्षण ठरत आहे.

फिटनेस-ट्रॅकिंग उपकरणांच्या जगात वाढती स्पर्धा असून, युजर्स आता फक्त ब्रँड नव्हे, तर किंमत, अचूकता आणि आराम यांवर आधारित निर्णय घेत आहेत. तज्ञांच्या मते, 2025 मध्ये स्मार्ट फिटनेस ट्रॅकर्सची मागणी अधिक वाढणार असून, बजेट ट्रॅकर्सही अनेकांच्या निवडीत सामील होणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस