ताज्या बातम्या

Maharashtra Flood : महाराष्ट्रात पूरस्थिती गंभीर! CM फडणवीसांनी केंद्राकडे तातडीची मागितली मदत

गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस महाराष्ट्रात सातत्याने पडत असून, यामुळे शेती आणि जनजीवनावर मोठा फटका बसला आहे. हजारो लोकांचे घरं उद्ध्वस्त झाली आहेत आणि शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • महाराष्ट्रात पूरस्थिती गंभीर! हजारो लोकांचे घरं उद्ध्वस्त

  • CM फडणवीसांनी केंद्राकडे तातडीची मागितली मदत

  • हवामानाचा अंदाज आणि परिस्थितीची गंभीरता

गेल्या चार दिवसांपासून मुसळधार (Maharashtra Flood) पाऊस महाराष्ट्रात सातत्याने पडत असून, यामुळे शेती आणि जनजीवनावर मोठा फटका बसला आहे. हजारो लोकांचे घरं उद्ध्वस्त झाली आहेत आणि शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागाची तातडीने पाहणी केली.

केंद्र सरकारकडे मदतीसाठी पत्र

केंद्र सरकारकडे यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्तपणे मदतीसाठी पत्र ( Devendra Fadnavis Letter To Amit Shah) पाठवले. ही भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रामध्ये राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) मधून भरीव मदत देण्याची मागणी केली आहे. जनतेला याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती (Maharashtra Flood) दिली आहे.

50 लाख हेक्टर शेती नुकसानग्रस्त

पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील 31 हून अधिक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेतीला प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस खरीप हंगामाच्या अखेरीपर्यंत सुरू असल्यामुळे सुमारे 50 लाख हेक्टर शेतीची जमीन नुकसानग्रस्त झाली आहे. या घटनेमुळे (Ndrf Relief Fund) लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांसाठी SDRF मधून राज्य सरकारने आपत्तीग्रस्त 2,215 कोटी रुपये वाटप केले आहेत. मात्र, आपत्तीचे प्रमाण अत्यंत मोठे असून हवामानाचा अंदाज पाहता परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

पत्रातील मुख्य 5 मुद्दे

1. अतिवृष्टी आणि पूरामुळे मोठे नुकसान

– महाराष्ट्रातील 31 हून अधिक जिल्ह्यांमध्ये सातत्याने मुसळधार पावसामुळे शेतीला प्रचंड नुकसान झाले असून लाखो शेतकऱ्यांची उपजीविका प्रभावित झाली आहे.

2. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मदत

-राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत 2,215 कोटी रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी वाटप केले आहे.

3. केंद्र सरकारकडून NDRF मधून अतिरिक्त मदतीची मागणी

– नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व्यापक आर्थिक मदत, जीवनावश्यक वस्तू, पशुधन हानी भरपाई आणि नुकसानग्रस्त मालमत्तेची पुनर्बांधणी करण्यासाठी NDRF मधून अतिरिक्त मदत मागितली आहे.

4. हवामानाचा अंदाज आणि परिस्थितीची गंभीरता

-हवामान विज्ञानाचे पूर्वानुमान दर्शवतात की परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त मदत गरजेची आहे.

5. पत्राद्वारे केंद्र सरकारकडे विनंती

-राज्य सरकारच्या संसाधनांनिशी पूर्ण मदत पुरवण्यासाठी NDRF अंतर्गत अतिरिक्त आर्थिक सहाय्य लवकरात लवकर केंद्राकडे विनंतीसह प्रस्ताव पाठवला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut : पीएम केअर फंडातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, संजय राऊतांची मागणी

Asia Cup 2025 Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादव अंतिम सामना खेळणार नाही? पीसीबीच्या तक्रारीमुळे टीम इंडियाच्या संघावर होणार परिणाम

Barshi : बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

तुमच्या हसण्यात दडलंय तुमच व्यक्तिमत्व! कसं ते जाणून घ्या...