Himachal Rain : हिमाचलमध्ये पूर आणि भूस्खलनाचा कहर; ट्यूनेजाची जिद्दीची संघर्षगाथा Himachal Rain : हिमाचलमध्ये पूर आणि भूस्खलनाचा कहर; ट्यूनेजाची जिद्दीची संघर्षगाथा
ताज्या बातम्या

Himachal Rain : हिमाचलमध्ये पूर आणि भूस्खलनाचा कहर; ट्यूनेजाची जिद्दीची संघर्षगाथा

भूस्खलनामुळे परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. या पार्श्वभूमीवर मंडी जिल्ह्यात एक धक्कादायक पण प्रेरणादायी प्रसंग घडला.

Published by : Team Lokshahi

Himachal Rain : हिमाचल प्रदेश सध्या मुसळधार पावसामुळे गंभीर संकटात सापडला आहे. अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून रस्ते, पूल पाण्यात गेले आहेत. काही ठिकाणी भूस्खलनामुळे परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. या पार्श्वभूमीवर मंडी जिल्ह्यात एक धक्कादायक पण प्रेरणादायी प्रसंग घडला. मंडीतील 20 वर्षीय तरुणी ट्यूनेजा ठाकूर भूस्खलनाच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती. जोरदार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात ती चिखल, दगड आणि मातीच्या ढिगाऱ्यांत पूर्णपणे गाडली गेली. परंतु, ट्यूनेजाने धैर्य न गमावता, आशा न सोडता स्वतःला वाचवण्याचा निर्धार केला.

श्वास घेण्यास अडचण होत असतानाही, तिने स्वतःहून माती बाजूला करत आपल्या श्वसनासाठी जागा निर्माण केली. तिचा जीव वाचवण्यासाठी तिचे कुटुंबीय व स्थानिक ग्रामस्थ तब्बल पाच तास प्रयत्न करत होते. अखेर तिचा ठावठिकाणा लागला आणि तिला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. या प्रसंगाबाबत ट्यूनेजाने सांगितलं की, "मी घाबरले होते, सर्वत्र गोंधळ माजला होता. मुसळधार पाऊस सुरू होता आणि लोकांची आरडाओरड ऐकू येत होती. मी सुरक्षित ठिकाण गाठण्याचा प्रयत्न करत होते, तेवढ्यात अचानक भूस्खलन झाले आणि मी ढिगाऱ्याखाली अडकले." तिच्या जिद्दीमुळे आणि आत्मविश्वासामुळे ती या संकटातून बाहेर पडू शकली.

ट्यूनेजाची ही संघर्षगाथा ऐकून राज्यातील उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि विरोधी पक्षनेते जय राम ठाकूर यांनी तिची भेट घेतली आणि तिच्या धैर्याचे कौतुक केले. दरम्यान, मंडी जिल्ह्यात पूर आणि ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 30 जूनच्या रात्री साडेअकराच्या सुमारास आलेल्या पुरामुळे गावात अफाट हानी झाली. मात्र ट्यूनेजाची जिद्द आणि धैर्य ही अनेकांसाठी प्रेरणादायक ठरत आहे.

हेही वाचा....

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा