कोल्हापूरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने 'महादेवी' हत्तीण गुजरातमधील वनतारा हत्ती केंद्राकडे पाठवण्यावर शिक्कामोर्तब झाले.
ज्यामुळे पोलिसांनी हत्तीणीला निशिदीकेजवळ नेले. रात्री 12.30 वाजता ॲनिमल ॲम्बुलन्स मधून महादेवी मोठ्या पोलीस बंदोबस्तात गुजरातच्या केंद्राकडे रवाना झाली. यावेळी हत्तीनीला निरोप देताना नांदणी कराना अश्रू अनावर झाले. मात्र 'महादेवी हत्तीणी' च्या मिरवणुकीला गालबोट लागलं आहे.
रात्री साडेअकराच्या सुमारास 'महादेवी हत्तीणी'ला मिरवणुकीने नेत असताना काही तरुणांनी दोन पोलिस गाड्यांवर दगडफेक केली आणि प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. यात काही जण किरकोळ जखमी झाले.