जम्मू- काश्मीरच्या पहलगामवर केलेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी कलाकारांचे अकाउंट्सवर बंदी घातली. त्यानंतर पाकिस्तानने बॉलिवूड गाण्यावर बंदी घातसी आहे. त्यासंदर्भातील पाकिस्तान सरकारने 1 मे रोजी अधिसूचना जारी केल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आपल्या प्रतिक्रिया दिली आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, "पाकिस्तानने आमची गाणी बंद केली चांगले गोष्ट आहे. आमच्या जीवावरच त्याची पोट भरत आहेत. तुम्ही आमची गाणी बंद केली आम्ही त्याचं पाणी बंद केलं. काही दिवसानंतर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही अशी कारवाई मोदी सरकारकडून अपेक्षित आहे."