ताज्या बातम्या

Manoj Jarange Maratha Protest : मोठी बातमी! कोर्टाच्या आदेशानंतर मुंबईच्या वेशीवर मराठा बांधवांच्या गाड्या थांबवल्या; पोलीस प्रशासनाकडून ठाण्यात आंदोलकांना अडवले

कोर्टाच्या आदेशानंतर पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर आला आहे. पोलीस प्रशासनाकडून ठाण्यात मराठा बांधवांच्या वाहनांना थांबवण्यात येत आहे.

Published by : Prachi Nate

Maratha Protesters' Vehicles Stopped In Thane : मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान हे आंदोलन चिघळताना पाहायला मिळत आहे. जरांगेंच मराठा आंदोलन थांबवण्यासाठी आणि आझाद मैदान रिकामी करण्यासाठी राज्य सरकारने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.

आझाद मैदान पोलिसांनी जरांगेंच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून लवकरात लवकर आझाद मैदान खाली करण्याबाबत नोटीस दिली आहे. तसेच पत्रात जरांगे पाटलांनी प्रसार माध्यमांवर केलेल्या वक्तवयाचीही पोलिसांनी दखल घेत त्याचा उल्लेखही नोटीसमध्ये केला आहे. आज मराठा आंदोलकांबाबत आज पुन्हा दुपारी 3 वाजता हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

दरम्यान मुंबई हायकोर्टाकडून राज्य सरकारला आदेश देण्यात आला होता की, "दुपारी 4 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा. मुंबईत आंदोलक येत असतील तर प्रतिबंधक करा. आझाद मैदान व्यतिरिक्त कुठेच आंदोलन नको. जेवणाचे ट्रक मुंबईत यायला नको, याची काळजी घ्या. कोर्टाच्या आदेशांचं पूर्णपणे उल्लघन केलं जायत. आंदोलनाला फक्त एक दिवसाची परवानगी होती. बाहेरुन येणाऱ्यांना वेशीवरच अडवा, तसेच गणेशोत्सवात वाहतूक कोंडी नको" असं म्हणत कोर्टाने आदेश दिले होते. त्यामुळे यावर आज होणाऱ्या सुनावणी मध्ये कोर्ट नक्की काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेल.

दरम्यान कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार मुंबईच्या वेशीवर ठाण्यात मराठा बांधवांच्या गाड्या थांबवल्या जात आहेत. पोलीस प्रशासनाकडून मराठा बांधवांच्या वाहनांना थांबवण्यात येत आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मदत करण्यासाठी जाणाऱ्या मराठा बांधवांच्या गाड्या न्यायालयाच्या आदेशाने ठाणे मुंबईच्या वेशीवर आनंदनगर चेक नाका या ठिकाण थांबविण्यात येत आहे. मराठा आंदोलकांना ठाणे रेल्वे स्थानकातून लोकलने मुंबईच्या दिशेने जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा