Kiran Mane On Maratha Reservation : मागील चार दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणाला मुबंईच्या आझाद मैदानावर बसले आहेत. त्यांच्यासोबत अनेक मराठा आंदोलक सहभागी झाले आहेत. आज आंदोलनांचा पाचवा दिवस आहे. याचपार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्यांने सोशलमीडियावर पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता किरण माने यांनी एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये मराठा आंदोलनांवर प्रतिक्रिया दिली आहे. किरण मानेने लिहितो की, "माझ्या हयातीत मी मुंबई पहिल्यांदा 'मराठी माणसांनी' गजबजलेली बघतोय ! अडाणीच्या ताब्यात जाता-जाता शेवटी का होईना पण आपल्या १०७ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचं यानिमित्तानं सोनं झालं. मराठा बांधवांचे खुप आभार."
किरण माने यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टखाली अनेकांनी 'क्या बात हैं किरण दादा यालाच म्हणतात मन की बात. 🙏' मुंबई महाराष्ट्राची, महाराष्ट्र माझा!! अशा आशयाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.