जागतिक महिला दिन हा जगभर उत्साहात साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सने ८ मार्च १९७५ ला महिला दिवस साजरा करण्याची सुरुवात केली होती. हा दिवस महिलांच्या हक्कासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवसांची सुरुवात झाली होती. या दिवशी महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. सर्वच क्षेत्रामध्ये महिलांचा सन्मान केला जातो. पण हा दिवस का निवडला त्यामागचे नेमके कारण काय? याबद्दल पुर्ण माहिती या लेखांमध्ये तुम्हाला मिळणार आहे.
आता महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. परंतु पुर्वी असे नव्हते. माहिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील समातेसाठी संघर्ष करावा लागत होता. यामुळेच 8 मार्च रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन इतका महत्त्वाचा ठरतो. प्रत्येक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा या दिवशी सन्मान केला जातो.
1908 मध्ये 15 हजार महिलांनी न्युयॉकमध्ये रस्त्यावर उतरत एक मोर्चा काढला होता. महिलांना मतदानाचा अधिकार, कमी तासांची नोकरी आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळावी. या तीम प्रमुख गोष्टींच्या मागण्यासह हा मोर्चा काढण्यात आला. रशियन महिलांनी 1917 मध्ये आंदोलन केले होते. तर युरोपमध्येही माहिलांनी 8 मार्चला शांतीचे समर्थन करण्यासाठी रॅली काढली होती. दोन वर्षानंतर 1913 मध्ये जागतिक महिला दिनाची तारीख बदलून 8 मार्च करण्यात आली आणि तेव्हापासून आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.