ताज्या बातम्या

Ind Vs Pak : भारताने पाकचा बुरखा फाडला; दिले दहशतवाद्यांसंबधीत अनेक पुरावे

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननेही कुरहोडी करण्यात सुरूवात केली. दरम्यान, भारताने पाकिस्तानमधील लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केले.

Published by : Rashmi Mane

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननेही कुरहोडी करण्यात सुरूवात केली. दरम्यान, भारताने पाकिस्तानमधील लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पत्रकार परिषद घेत सद्यपरिस्थिती देशासमोर मांडली. त्यांनी यावेळी सांगितले की, "भारताचा उद्देश हा मुद्द्यापासून भरकटण्याचा नाही. तर आम्ही मुद्द्याला धरून आहोत. भारताने फक्त पाकिस्तानमधील दहशतवादी आणि त्यांच्या तळांनाच लक्ष्य केले आहे. ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर पाकिस्तानकडून भारतात १५ ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भारताने पाकिस्तानी ड्रोन हवेतच उद्ध्वस्त केली. पाकिस्तानकडून एलओसीवर निष्पाप नागरिकांवर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला. भारताला तणाव वाढवायचा नाही. ऑपरेशन सिंदूरमुळे 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. मात्र मृत दहशतवाद्यांवर पाकिस्तानने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले," असे फोटो विक्रम मिसरी यांनी दाखवले.

फोटोमध्ये पाकिस्तानी सैनिक आणि अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादीही प्रार्थना करताना दिसत असल्याचे त्यांनी म्हटले. "जर भारताच्या हल्ल्यात सामान्य नागरिक मारले गेले असते, तर मग सामान्यांचे अंत्यसंस्कार पाकिस्तानी ध्वजात लपेटून केले जातात का?, जर शासकीय इतमामात सामान्य नागरिकांचे अंत्यसंस्कार होत असतील, तर हे आश्चर्यच म्हणावे लागेल. भारताने अनेकदा पाकिस्तानला दहशतवाद्यांसंबंधीत पुरावे दिले. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. या उलट ती माहिती त्यांनी दहशतवाद्यांनाच पुरवली," असे मिसरी म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा