Foreign woman Ganga Controversy : गंगा नदी ही भारतीय संस्कृतीत श्रद्धा, आस्था आणि पवित्रतेचे प्रतीक मानली जाते. या नदीत स्नान केल्याने पापांचा नाश होतो, अशी श्रद्धा आहे. मात्र, ऋषिकेश येथील लक्ष्मण झूला परिसरात एका विदेशी महिलेनं बिकिनी परिधान करून गंगेच्या पाण्यात डुबकी घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तीव्र वाद निर्माण झाला आहे.
या व्हिडिओमध्ये ती महिला गळ्यात फुलांचा हार घालून आणि कपाळावर लाल तिलक लावून गंगेच्या पाण्यात स्नान करताना दिसते. मात्र, बिकिनी परिधान केल्यामुळे काही भारतीय नेटकरी नाराज झाले आहेत. अनेकांनी तिच्या कृतीला “भारतीय संस्कृतीचा अपमान” ठरवत टीका केली असून काहींनी तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, काही नेटकऱ्यांनी मात्र तिच्या बाजूने प्रतिक्रिया देत ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या मते, “पुरुष चड्डीमध्ये पाण्यात उतरतात तेव्हा कोणी प्रश्न उपस्थित करत नाही, मग महिलांवरच टीका का?” काहींनी गंगेतील अस्वच्छतेचे फोटो शेअर करत म्हटले आहे, “दररोज नदीत प्रदूषण करणे पाप नाही का?”
हा व्हिडिओ https://www.instagram.com/p/DQJYhcPEWoL/या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून आतापर्यंत कित्येक लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काहींनी ही कृती श्रद्धेचा अपमान असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी ती महिलेची वैयक्तिक श्रद्धा असल्याचे सांगितले आहे. सध्या त्या विदेशी महिलेबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या घटनेने भारतीय संस्कृती आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यावरील चर्चेला नव्याने उधाण आले आहे.