ताज्या बातम्या

World Environment Day : महिला सक्षमीकरणासह वनसंरक्षणासाठी वनमंत्र्यांनी घेतले 'हे' ठोस निर्णय

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चंद्रपूर येथे आयोजित दोन दिवसांच्या "वनशक्ती कॉन्फरन्स" मध्ये महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी महिलांचे सक्षमीकरण, वनसंरक्षण आणि विभागीय सुधारणा याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.

Published by : Rashmi Mane

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चंद्रपूर येथे आयोजित दोन दिवसांच्या "वनशक्ती कॉन्फरन्स" मध्ये महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी महिलांचे सक्षमीकरण, वनसंरक्षण आणि विभागीय सुधारणा याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.

यावेळी बोलताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, "महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पदांवर महिलांची नियुक्ती ही अभिमानास्पद बाब आहे. मुख्य सचिव सुजाता सोनी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि स्मिता विश्वास या तीन प्रमुख महिला राज्याच्या प्रशासनात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत." त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र मंत्रालयात 50 टक्क्यांहून अधिक महिला सचिव पदावर कार्यरत आहेत, हे राज्यासाठी गौरवाचे लक्षण आहे.

वनमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

• वनसंरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी अधिकारी व वनरक्षक यांना उच्च प्रतीच्या गाड्या देण्याचे आश्वासन.

• वनपाल, ACF, DFO यांना काळानुरूप आधुनिक शस्त्रास्त्रं आणि उपकरणं पुरविण्यात येणार.

• वन विभाग हे केवळ शासकीय यंत्रणा नसून एक "परिवार" असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

• विभागात सध्या रिक्त असलेली पदे लवकरच भरली जातील. यामध्ये 50 टक्क्यांहून अधिक जागा महिलांसाठी आरक्षित असतील.

• मानद वनरक्षक पद सध्या जिल्हास्तरीय आहे, ते प्रत्येक तालुक्यापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल.

• वनक्षेत्रात लागणाऱ्या आगी टाळण्यासाठी अभ्यास पथक नेमले जाणार असून, देशातील इतर ठिकाणच्या प्रभावी तंत्रज्ञानाचा अभ्यास करून महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी केली जाईल.

• वन्यप्राणी मानवी वस्तीत न येण्यासाठी जंगलात कोरड्या भागात त्यांच्या गरजेची झाडे लावण्यात येतील, जेणेकरून त्यांना नैसर्गिक अधिवास व अन्न साखळीचा पुरवठा होईल.

• पर्यटन वृद्धिंगत करण्यासाठी वनपरिसरात पंचतारांकित सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.

• राज्यात बिबट्या आणि वाघांचे हल्ले टाळण्यासाठी एकाच वेळी सर्व विभागांत अलार्म सिस्टम बसविण्याचे काम हाती घेतले जाईल.

यावेळी वनमंत्री म्हणाले की, "1995 मध्ये मी प्रथम वनमंत्री होतो. तेव्हा फॉरेस्ट जवानांकडे शस्त्र नव्हती, केवळ दांडे होते. मी त्यांना जिप्सी गाड्या, वायरलेस सिस्टीम तसेच पिस्तूल आणि रायफल परवाने देण्याचे काम केले."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दहा कोटी वृक्ष लागवडीच्या निर्णयाचेही त्यांनी स्वागत केले. "हा प्रस्ताव मी एक महिना आधीच मुख्यमंत्र्यांकडे ठेवला होता," असे त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी "वनशक्ती कॉन्फरन्स" मध्ये वनविभागाचे मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वनबल प्रमुख शोभिता विश्वास, आयसीएफ देहराडूनच्या महासंचालक कांचन देवी, तेलंगणाच्या डॉ. सुवर्णा यांच्यासह देशभरातील वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

आपले भाषण समाप्त करताना वनमंत्री नाईक म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा घडवण्यासाठी आई जिजामातांचा मोलाचा वाटा होता. म्हणूनच महाराष्ट्रात महिलांना मान, स्थान आणि संधी मिळावी यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड

The sound of Breaking Fingers : बोटे मोडल्याने आवाज कसा येतो माहीत आहे का? नसेल माहित जाणून घ्या...