ताज्या बातम्या

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या खांद्याला आणि पायाला दुखापत झाल्याने त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या खांद्याला आणि पायाला दुखापत झाल्याने त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री पाटणा येथील त्यांच्या घराच्या पायऱ्या चढत असताना पडले होते. त्यानंतर त्यांना पाटण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने पाटण्याहून दिल्लीला आणण्यात आले आहे.

आज सकाळपर्यंत लालू यादव यांच्या शरीरात कोणत्याही प्रकारची हालचाल आढळून आली नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. वाढत्या समस्यांमुळे दिल्ली एम्समधील डॉक्टरांनी लालू यादव यांची सर्व तपासणी केली. दुसरीकडे लालू यादव यांचे समर्थक त्यांच्या बरे होण्यासाठी पूजापाठ करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी पाटण्याच्या अनेक मंदिरांमध्ये होम हवन केले जात आहे. यापूर्वी लालू प्रसाद यादन यांना किडनी प्रत्यारोपणासाठी सिंगापूरला नेण्यात येणार होते. परंतु फ्रॅक्चरनंतर आता डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पुढची पाऊले उचलण्यात येणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा