ताज्या बातम्या

K. Kasturirangan : इस्त्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचं निधन

इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे बेंगळुरू येथे निधन.

Published by : Prachi Nate

इस्रोचे माजी प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे आज बेंगळुरू येथील त्यांच्या राहत्या घरी सकाळी 10.43 वाजता निधन झाले आहे. डॉ. के. कस्तुरीरंगन यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1940 रोजी झाला आहे. इस्रोचे माजी प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी इस्रोमध्ये अध्यक्ष आणि सचिव म्हणून 9 वर्षांहून अधिक काळ भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे नेतृत्व केले.

तसेच डॉ. कस्तुरीरंगन यांनी मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्रात बॅचलर ऑफ सायन्स आणि मास्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त केली. त्याचसोबत 1971 मध्ये अहमदाबादमधील भौतिक संशोधन प्रयोगशाळेतून प्रायोगिक उच्च ऊर्जा खगोलशास्त्रात पदव्युत्तर मिळवली. आज त्यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला असून त्यांचे पार्थिव २७ एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच्या वेळात आरआरआय येथे ठेवण्यात येणार आहे.

डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी मिळवलेले पुरस्कार

डॉ. के. कस्तुरीरंगन हे प्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्रज्ञ होते. त्याचसोबत त्यांनी भारताच्या अंतराळ योजनेत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, ज्यात त्यांनी (PSLV) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन आणि ( GSLV) भू-समकालिक उपग्रह प्ररक्षेपण वाहने यशस्वी प्रक्षेपणांचा समावेश आहे. डॉ. के. कस्तुरीरंगन हे नियोजन आयोगाचे सदस्य ते भारतीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष त्याचसोबत भारतीय विज्ञान काँग्रेसचे सरचिटणीस होते.

तसेच ते आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघ, आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र अकादमीसह विविध आंतरराष्ट्रीय समित्या आणि संघटनांचे सदस्य देखील राहिले आहेत. डॉ. के. कस्तुरीरंगन यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. एवढचं नाही तर इंडियन अकादमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल सायन्स अकादमी आणि थर्ड वर्ल्ड अकादमी ऑफ सायन्सेससह विविध वैज्ञानिक अकादमी आणि संघटनांनी देखील त्यांना सन्मानित केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा