माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील प्रचारसभेत जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची आठवण काढली. “आज एक महत्त्वाची व्यक्ती आमच्यासोबत नाही, याची जाणीव होते,” असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कराड हे संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी असून, सध्या बीडच्या कारागृहात आहेत. याआधी, पंकजा मुंडे यांनीही एका प्रकरणात निर्दोष व्यक्तीला कशाप्रकारे दोषी ठरवले जातात, यावर वक्तव्य केलं आहे.