ताज्या बातम्या

Arun Jagtap : संग्राम जगताप यांना पितृशोक, माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन

अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील, माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन झालं.

Published by : Siddhi Naringrekar

अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील, माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन झालं. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अरुण जगताप हे नगरच्या राजकारण आणि समाजकारणात काका या नावाने ओळखले जायचं. ते अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अरुण जगताप दोन वेळा स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधानपरिषद सदस्य म्हणून निवडून आले होते.

अरुण जगताप यांची राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षातून सुरु झाली. त्यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद देखील भूषवले. त्यांनी दोन वेळा अहिल्यानगर शहर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने अहिल्यानगरसह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dhananjay Munde : धनंजय मुंडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; बंजारा समाज आक्रमक

America Tariff News : 'टॅरिफ संकट आता...' मोठं नुकसान टळलं! भारतासाठी दिलासादायक बातमी

SP NCP Jan Akrosh Morcha : शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? रोहित पवारांचा सरकारला थेट सवाल

Mumbai BMC : मॅनहोलभोवती पहारा देणारा 'BMC' चा सुपरमॅन; मुंबईकरांच्या काळजीपोटी भरपावसात पहारा