Admin
Admin
ताज्या बातम्या

डोंबिवली शहरात रुग्णवाहिका बंद पडल्याने माजी आमदाराचा मृत्यू

Published by : Siddhi Naringrekar

डोंबिवली सारख्या शहरात रुग्णवाहिका बंद पडल्याने माजी आमदाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रुग्णवाहिका बंद पडल्याने देसाई यांचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. माजी आमदार सुर्यकांत देसाई हे 83 वर्षांचे होते. शिवसेनेचे माजी आमदार होते. 1995 ते 2000 या काळात ते परळ-लालबाग विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार म्हणून त्यांनी काम केले आहे.

सुर्यकांत देसाई यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने डोंबिवलीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णवाहिका बोलावून घेतली. मात्र थोड्या अंतरावर गेल्यावर ही रुग्णवाहिका बंद पडली. रुग्णालयात गेल्यानंतर त्यांचा ईसीजी काढण्यात आला. मात्र, तोपर्यंत देसाई यांचा मृत्यू झाला होता.

त्यांचा मृत्यू झाल्याने या रुग्णवाहिकेच्या मालकाविरोधात देसाई यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Ashish Shelar : एवढी घबराट आणि पळपुटेपणा उद्धवजी तुमच्या पक्षाचा असेल तर रिंगणातून बाहेरच जा

Sanjay Raut : निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग हा पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या पकडीत आहे

मतदानाच्या हक्क बजावल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Cm Eknath Shinde : बोगस मतदान आणण्याची आम्हाला आवश्यकता काय आहे? आज संपूर्ण मतदार जो आहे महायुतीच्या प्रेमात आहे

आमदार गणेश नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...