थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nirmala Gavit Accident) माजी आमदार निर्मला गावित यांचा भीषण अपघात झाला. घराजवळ नातवासोबत फेरफटका मारत असताना हा अपघात झाला. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या असून उपघाताचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे.
नाशिकच्या खाजगी रुग्णालयात निर्मला गावित यांच्यावर उपचार सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आता नाशिकच्या म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या रामनाथ चौहान या कार चालकला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून काल रात्री कार चालकाला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Summery
माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरणी कारवाई
गाडीला ठोकर दिलेल्या कारचालकला पोलिसांनी घेतलं ताब्यात
नातवाला फिरवत असताना चारचाकीने दिलेली धडक