Sambhaji Raje Bhosale Team Lokshahi
ताज्या बातम्या

"हे महाशय राज्यपाल पदाचीच नव्हे तर..."; संभाजी राजेंचं थेट PM मोदी अन् राष्ट्रपतींना आवाहन

राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ या विषयात गांभीर्यानं लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचं भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा अशी मागणी संभाजी राजेंनी केली आहे.

Published by : Team Lokshahi

वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी आज पुन्हा एक वक्तव्य करुन वादाला तोंड फोडलं आहे. 'मुंबई, ठाण्यातून गुजराती अन् राजस्थानी लोक काढून टाकले तर मुंबईला (Mumbai) आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही' असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आणि राज्यात एक नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई बाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी आज ट्विट करत भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्याची व याठिकाणी महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, अशी मागणी केली आहे. (Sambhaji Raje Bhosale Reaction on Governor Bhagatsingh Koshyari Controversial Statement)

"विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत. त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ या विषयात गांभीर्यानं लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचं भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा." अशा शब्दांत संभाजीराजे भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्यातील सर्व पक्षांकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध केला जातोय. मनेसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या नेत्यांसह भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विधानाचा निषेध केला आहे. मात्र आता राष्ट्रवादी पक्ष यावरुन आक्रमक झाला असून, मुंबईत राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं आहे.

वादानंतर राज्यपालांनी दिलं स्पष्टीकरण

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून एक निवेदन प्रसिद्ध कऱण्यात आलं आहे. या निवेदनात कोश्यारी म्हणतात की,मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी