थोडक्यात
कल्याणमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला
हल्ल्यात माजी नगरसेवक उमेश बोरगावकरांसह 2 जण जखमी
हल्ला करणाऱ्या आरोपीचा पोलीस तपास सुरु
( Kalyan) कल्याणमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात माजी नगरसेवक उमेश बोरगावकरांसह 2 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
कार्यालयासमोर दुसऱ्याचं भांडण सोडवून झाल्यावर जखमी इसमाला रुग्णालयात नेत असताना अज्ञात इसमांकडून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ज्ञानेश्वर सपाट, ओंकार सपाट हे दोघे जखमी झाले. हा हल्ला कसा झाला, कोणी केला याचा तपास आता पोलीस करत आहेत.