Fortress Of District Law Even On Kites Priced Between 120 To 1000 Rupees Gujarat Attractive Kites Available For Sale In Nashik 
ताज्या बातम्या

Nashik News : मकरसंक्रांतीला वेगळाच ट्रेंड! नाशिकमध्ये संदेश छापलेले महागडे पतंगांची विक्री

Nashik News : मकरसंक्रांतीच्या आगमनानंतर नाशिकमध्ये पतंग विक्रीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शहरभर विविध ठिकाणी तात्पुरते पतंग विक्री स्टॉल्स लागले आहेत.

Published by : Riddhi Vanne

मकरसंक्रांतीसाठी नाशिकमध्ये पतंगांची धमाल विक्री

मकरसंक्रांतीच्या आगमनानंतर नाशिकमध्ये पतंग विक्रीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शहरभर विविध ठिकाणी तात्पुरते पतंग विक्री स्टॉल्स लागले आहेत. शालिमार, अशोक स्तंभ आणि रविवार कारंजा परिसरात गुजराती डिजाईनचे आकर्षक पतंग विक्रीस आले आहेत. या रंगीबेरंगी आणि उच्च दर्जाच्या पतंगांना मोठा प्रतिसाद मिळत आहे, असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे.

पतंगांचे दर आणि विविध आकार
मध्यम आकाराचे पतंग साधारणतः १२० ते १५० रुपये दरामध्ये मिळत आहेत. एका पॅकेटमध्ये १० पतंग दिले जातात. तसेच, मोठे कापडी पतंग १ हजार रुपयांना विक्रीस आहेत. लहान मुलांसाठी तळहातावर मावणारे बेबी पतंग १५ रुपयांना मिळत आहेत.

नवा आकर्षण: चायनीज ड्रॅगन
यंदा नवा ट्रेंड म्हणून चायनीज ड्रॅगन पतंग विक्रीस आला आहे. छोट्या आकाराच्या या पतंगावर फिशिंग स्टिक चिकटवून उडवले जाते. उंच न उडता, सोप्या पद्धतीने उडवता येणारा हा पतंग लहान मुलांचे आकर्षण ठरत आहे.

पोलिसांची कडक कारवाई
शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन पोलिसांनी तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. याचा नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, आणि सण-उत्सवांमध्ये पोलिसांच्या कडक कारवाईला एक ट्रेंड मानला जात आहे.

दोन हजार रुपयांची आकर्षक चक्री
पतंग उडवण्यासाठी चक्री महत्त्वाची असते. यंदा बाजारात २ हजार रुपयांच्या आकर्षक डिजाईन असलेल्या चक्र्या उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त, प्लॅस्टीक मटेरियलपासून बनलेल्या चक्र्यांची किमत ५० ते ५०० रुपये पर्यंत आहे. मकरसंक्रांतीसाठी नाशिकमध्ये पतंगांची धमाल पाहता, सणाचा आनंद आणखी वाढला आहे.

थोडक्यात

  1. मकरसंक्रांतीनंतर नाशिकमध्ये पतंग विक्रीचा उत्साह शिगेला.

  2. शहरातील विविध भागांत तात्पुरते पतंग विक्री स्टॉल्स उभारले.

  3. शालिमार, अशोक स्तंभ आणि रविवार कारंजा परिसरात मोठी गर्दी.

  4. गुजराती डिझाइनचे आकर्षक पतंग विक्रीस दाखल.

  5. रंगीबेरंगी आणि उच्च दर्जाच्या पतंगांना मोठा प्रतिसाद, विक्रेत्यांचा दावा.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा