ताज्या बातम्या

50 लाखाच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या चौघांना अटक

Published by : Team Lokshahi

अमझद खान | कल्याण : 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी डोंबिवलीतील एका व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या चार आरोपींना मानपाडा पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये अटक केली आहे. हिंमत नाहार असे या व्यापाऱ्याचे नाव असून पोलीसांनी त्याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरुप सुटका केली आहे.

डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिमंत नाहार यांचे डिलिक्स प्लायवूड हे दुकान आहे. 3 ऑगस्ट रोजी संजय विश्वकर्मा नावाचा एक इसम आला. त्याने प्लायवूड संदर्भात काही व्यवहार केले. अॅडव्हान्सचे पैसे एटीएममधून काढून देतो असे सांगून दुकानापासून काही अंतरावर घेऊन गेला. तिथून हिंमत नाहार यांना एका गाडीत घेऊन जात. त्यांचे अपहरण केले. काही तासातच हिंमत यांचे पुतणो जितू यांना फोन आला. फोन करणा:या व्यक्तीने हिंमत याना सोडण्यासाठी 50 लाख रुपयांची मागणी केली. जितू यांनी या संदर्भात मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

कल्याणचे डिसीपी सचीन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु झाला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांनी तपासासाठी सुनिल तारमळे आणि अविनाश वनवे या पोलिस अधिका:यांची पथके नेमली. पोलिसांचा तपास सुरु झाला. अपहरण करणारा व्यक्ती जितू यांना पैसे घेऊन काही ठिकाणी बोलवित होता. जितू यांना मुंबई आग्रा रोडवरील गोठेघर गावाजवळील एका बोगद्याच्या ठिकाणी पैसे घेऊन येण्यास सांगितले. जितू हे पैसे घेऊन गेले. पोलिसांची चार पथके गावक:यांच्या वेशात गोठेघर परिसरात आधीच दबा धरुन बसली होती. थोडय़ाच वेळात त्याठिकाणी एक झायलो कार आले. त्यात तीन व्यक्ती होते. जितू याने आधी काकांना मला माङया ताब्यात द्या असे सांगितले. त्याचवेळी पोलिसांनी झायलो कारला घेरले. गावातील एका खोलीत हिंमत नाहार यांना कोडून ठेवले होते. त्यांची त्याठीकाणाहून सुटका केली. या प्रकरणी संजय विश्वकर्मा, संदीप रोकडे, धर्मराज कांबळे आणि रोशन सावंत या चोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मानपाडा पोलिसांच्या या कामागिरीचे सर्वत्र कोतूक होत आहे.

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण