ताज्या बातम्या

मुल जन्माला आल्याचा आनंद झाला, पण 4 हात अन् 4 पाय पाहून चक्रावले आई-वडील

Published by : Sudhir Kakde

उत्तर प्रदेशातील हरदोई येथे एका महिलेने चार पाय आणि चार हात असलेल्या मुलाला जन्म दिला आहे. सुरुवातीला बाळ पूर्णपणे निरोगी असल्याचं सांगण्यात आले, मात्र काही वेळानं बाळाला लखनौ येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलं. दुसरीकडे, बाळाच्या प्रकृतीची माहिती मिळताच रुग्णालयात गर्दी होऊ लागली. ही घटना हरदोई जिल्ह्यातील शाहाबाद सीएचसीमध्ये घडली आहे. (Four legs four hand baby birth in Uttar Pradesh)

शनिवारी रात्री उशिरा एका महिलेनं चार हात आणि चार पाय असलेल्या मुलाला जन्म दिल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केली. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जन्मलेल्या या मुलाचे चार हात आणि चार पाय पाहून लोक आश्चर्यचकित झाले. सुरुवातीला डॉक्टरांच्या टीमलाही आश्चर्य वाटलं पण नंतर त्यांनी यामागचं संभाव्य कारणही सांगितलं. हे मूल करिना आणि संजय याचं असून, शाहाबादमधील मांगलीपूरचे रहिवासी आहेत. जन्मानंतर जेव्हा घरातील सदस्यांनी मुलाला पाहिलं तेव्हा त्यांना विश्वास बसेना. ते अस्वस्थ झाले. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की, ही जुळी

दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात गर्दी होऊ लागली. या मुलाचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा मुलगा म्हणजे देवाचा अवतार असल्याचं अनेकांना वाटतं आहे. सध्या डॉक्टरांनी खबरदारीचा उपाय म्हणून बाळाला शाहबाद येथून हरदोई आणि नंतर लखनौला उपचारासाठी पाठवलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा