Virar Building Collapse : विरारमध्ये चार मजली इमारत कोसळली; 14 मृत्यू, अनेकजण बेपत्ता Virar Building Collapse : विरारमध्ये चार मजली इमारत कोसळली; 14 मृत्यू, अनेकजण बेपत्ता
ताज्या बातम्या

Virar Building Collapse : विरारमध्ये चार मजली इमारत कोसळली; 14 मृत्यू, अनेकजण बेपत्ता

वाढदिवसाच्या दिवशीच दुर्घटना: इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू

Published by : Riddhi Vanne

Virar Building Collapse : विरारच्या नारंगी फाटा परिसरात मंगळवारी रात्री उशिरा एक गंभीर अपघात घडला. स्वामी समर्थ नगरमधील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील चौथ्या मजल्याचा भाग कोसळला. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तर एक जखनी असून दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.

एनडीआरएफच्या 5 व्या बटालियनच्या 2 पथकांकडून घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. एनडीआरएफच्या अहवालानुसार आतापर्यंत १४ मृतदेह बाहेर काढले आहेत. तर १ ज़ख़मी असून दोघाना सुरक्षित बाहेर काढलं आहे. एनडीआरएफ घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत 7 जणांना सुरक्षित बाहेर काढले होते.सध्या ढिगारा हटवण्याचे आणि अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी इमारतीत जोयल कुटुंबातील एका लहान मुलीचा वाढदिवस सुरू होता. दुर्दैवाने त्या चिमुरडीचा आणि तिच्या आईचा यात मृत्यू झाला आहे, तर वडील बेपत्ता आहेत. तसेच चौथ्या मजल्यावर राहणारे सचिन निवळकर, त्यांची पत्नी सुपरीला आणि मुलगा अर्णव यांच्याशीही अद्याप संपर्क साधता आलेला नाही.

स्थानिक रहिवाशांच्या मते, अपार्टमेंटची स्थिती अनेक दिवसांपासून जीर्ण झाली होती. महापालिकेने यापूर्वी इमारतीबाबत ऑडिट करण्याची नोटीस दिली होती. परिसर दाट वस्तीचा असल्यामुळे जड यंत्रसामग्री घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत आहेत. सध्या इमारत पूर्णपणे रिकामी करण्यात आली असून, मलबा हटवून अडकलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा