Mumbai Team Lokshahi
ताज्या बातम्या

मैत्रीत व्यवहार नको! उधार 500 रूपयांसाठी घेतला मित्राने मित्राचा जीव

वांद्रे परिसरात घडली धक्कादायक घटना

Published by : Sagar Pradhan

रिध्देश हातिम|मुंबई: आपण अनेक वेळा ऐकले असेल की एक मित्र दुसरा मित्रासाठी जीव द्यायला तयार असतात. बरेच मित्र मैत्रीत चुकून कुठली गोष्ट तुटली किंवा खराब झाली तर त्याचे पैसे पण घेत नाही. मात्र, या उलट वांद्रे परिसरात वेगळे दृश्य पाहायला मिळाले आहे.

वांद्रेच्या गरीब नगर भागात दोन खास मित्र राहत होते. मागील एक महिन्यापूर्वी एकाकडून दुसर्‍या मित्राचा मोबाईल पडून मोबाईल खराब झाला होता व त्यासाठी एक हजार रुपये खर्च सांगितला होता. सदर खर्चाचे 1000₹ पैकी आरोपीने 500 रुपये हे मित्राच्या पत्नीस दिले व उर्वरित रात्री बारापर्यंत देतो असे सांगितले.

परंतु, मित्राने आजच 500 रुपये पाहिजे असा तगादा लावला आणि त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. बांद्रा रेल्वे स्टेशन ब्रिजजवळ खाली त्यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली त्यावेळी आरोपीचा मोठा भाऊ हा देखील मारहाण करत होता. त्यानंतर ते तिथून प्लॅटफॉर्म नंबर 07 वरून पायऱ्या चढून जात असतानाच आरोपी मित्राला खाली खेचले व त्याच्या हातातील चाकू त्याच्या छातीत भोसकले व तो चाकू त्याच्या मोठ्या भावाकडे दिला. भांडणांमध्ये तो गंभीर जखमी झाला व उपचारासाठी भाभा रुग्णालयात नेले असता त्यास दाखल पूर्व मयत घोषित केले.

मयताची पत्नी यांचा जबाब नोंद करून वर गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी तपास सुरु अवघ्या केला आणि अवघ्या एक तासात आरोपी असलेल्या दोन सख्या भावांना ताब्यात घेतले आहे. शादाब चांद मोहम्मद खान उर्फ भुरा (21 वर्ष) आणि शानु चांद मोहम्मद खान (22वर्षे ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.नाजिम इफ्तेकार खान (25 वर्ष) अस मृत तरुणाचे नाव आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयकावरून गदारोळ

Dhadak 2 Trailer Out : पुन्हा एक हळवी प्रेमकहाणी; 'धडक 2' चा ट्रेलर लाँच

Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल

Ajit Doval : 'तुमच्याकडे भारतात झालेल्या नुकसानीचा एकतरी फोटो आहे का?'; अजित डोवाल यांचे विदेशी माध्यमांना खुले आव्हान