Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ला मित्र-मैत्रिणींना द्या ‘हे’ खास गिफ्ट्स; तुमचं नातं बनवा अधिक घट्ट! Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ला मित्र-मैत्रिणींना द्या ‘हे’ खास गिफ्ट्स; तुमचं नातं बनवा अधिक घट्ट!
ताज्या बातम्या

Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ला मित्र-मैत्रिणींना द्या ‘हे’ खास गिफ्ट्स; तुमचं नातं बनवा अधिक घट्ट!

फ्रेंडशिप डे साठी खास गिफ्ट्सची यादी; मैत्रीला आणा नवसंजीवनी

Published by : Team Lokshahi

‘फ्रेंडशिप डे’ला मित्र-मैत्रिणींना द्या ‘हे’ खास गिफ्ट्स; तुमचं नातं बनवा अधिक घट्ट!

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजे मैत्रीचा उत्सव – फ्रेंडशिप डे! यंदा हा दिवस आणखी खास बनवायचा असेल, तर तुमच्या मित्रमैत्रिणींना एखादी हटके, मनापासूनची भेट देऊन त्यांना खुश करा. बाजारात अशा काही युनिक आणि ट्रेंडी गिफ्ट्स उपलब्ध आहेत, जे मैत्रीच्या नात्यात अजूनच गोडवा आणतील.

आजच्या घाईगर्दीच्या आयुष्यात मित्र हे आपल्या जगण्याचा आधार बनतात. त्यामुळे त्यांच्यासाठी एखादं प्रेमळ आणि उपयोगी गिफ्ट देऊन फ्रेंडशिप डे अविस्मरणीय करता येतो. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन ही खास भेटवस्तूंची यादी खास तुमच्यासाठी—

कॉफी मग – रोजच्या मैत्रीचा एक साक्षीदार!

जर तुमच्या मैत्रिणीला कॉफीची आवड असेल आणि तिचं व्यक्तिमत्व वेगळं असलं, तर एखादा कस्टमाइज्ड किंवा क्युट कॉफी मग गिफ्ट म्हणून परफेक्ट ठरेल. तिच्या नावाचा, एखाद्या मैत्रीच्या कोटसह छापलेला मग हा एक सुंदर आठवण बनू शकतो.

टोट बॅग – फॅशन आणि उपयोग एकत्र

आजच्या युथमध्ये टोट बॅग्स हा एक नवा फॅशन ट्रेंड बनलाय. प्रत्येक कॉलेजगोइंग मुलीला किंवा ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलेला एक स्टायलिश टोट बॅग हवीच असते. मग जर तुमच्या मैत्रिणीला यामध्ये रस असेल, तर ह्या युनिक आणि अर्थपूर्ण गिफ्टने तुम्ही तिला नक्की खुश करू शकता.

फोन कव्हर – व्यक्तिमत्व दाखवणारी भेट

कार्टून डिझाईन्स, मिरर कव्हर्स, मोटिवेशनल कोट्स किंवा तिच्या आवडत्या सिरीजवर आधारित फोन कव्हर गिफ्ट देणं म्हणजे तिच्या फोनलाही एक खास लुक देणं! हे गिफ्ट तिच्या रोजच्या वापरात येतं आणि तुमची आठवणही सतत तिला येते.

ट्रेंडी इअररिंग्स – प्रत्येक लूकसाठी योग्य

कानातले हे महिलांसाठी सर्वात लाडके अ‍ॅक्सेसरी असतात. ट्रेंडी इअररिंग्सचा एक सेट हा फ्रेंडशिप डे साठी उत्तम पर्याय ठरू शकतो. हे गिफ्ट तिच्या व्यक्तिमत्त्वात चारचाँद लावेल.

आय मेकअप किट – सौंदर्यप्रेमींसाठी खास

तुमच्या मैत्रिणीला मेकअपची आवड असेल, तर एक अच्छं आय मेकअप किट ही तिच्यासाठी योग्य भेट ठरू शकते. बाहेर जाताना किंवा एखाद्या फंक्शनला परफेक्ट लुकसाठी हे गिफ्ट नक्कीच उपयोगी पडेल.

परफ्युम – एक गंधमय आठवण

परफ्युम ही एक क्लासिक आणि सेंसिटिव भेट आहे. तिच्या आवडत्या फ्रॅग्रन्सचा विचार करून निवडलेला परफ्युमचा बॉक्स मैत्रीला एक नवा सुगंध देईल.

नोटबुक – विचारांची डायरी

काही लोकांना लिहिण्याची आवड असते. ते आपले विचार, भावना, यादी, आठवणी किंवा स्वप्नं एका खास नोटबुकमध्ये टिपून ठेवतात. अशा मैत्रिणीला स्पेशल कव्हर असलेली नोटबुक भेट देणं म्हणजे तिच्या व्यक्तिमत्त्वाची कदर करणे होय.

फ्रेंडशिप डे गिफ्ट म्हणजे फक्त वस्तू नव्हे, तर भावना!

एखादी छोटी भेटसुद्धा मैत्रीला नवसंजीवनी देऊ शकते. यंदाचा फ्रेंडशिप डे गोड स्मृतींनी सजवण्यासाठी ही खास गिफ्ट्सची यादी नक्की वापरून पाहा. तुमच्या निवडीमुळे तुमच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावर हसू उमटेल, आणि त्याहून मोठं गिफ्ट दुसरं काहीच नाही!

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ramdas Kadam : सावली बार प्रकरणावरून राजकारण तापलं : रामदास कदमांचा परबांवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले - "तू राजीनामा...."

Aaditya Thackeray X Post : फ्रेंडशिपच्या शुभेच्छा देत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना काढला चिमटा!

Russia Earthquake News : कामचाटकात निसर्गाचा कहर: तीव्र भूकंप आणि ज्वालामुखीचा स्फोट

Ahilyanagar : 'प्री-वेडिंग' बंद करा, लग्न, साखरपुडा, हळद...; हगवणे प्रकरणानंतर अहिल्यानगरात मराठा समाजाचे आचारसंहिता संमेलन