Milk price Drop : सर्वसामान्यांना दिलासा! २२ सप्टेंबरपासून 'या' दुधाच्या किमंती कमी होण्याची शक्यता  Milk price Drop : सर्वसामान्यांना दिलासा! २२ सप्टेंबरपासून 'या' दुधाच्या किमंती कमी होण्याची शक्यता
ताज्या बातम्या

Milk price Drop : सर्वसामान्यांना दिलासा! २२ सप्टेंबरपासून 'या' दुधाच्या किंमती कमी होण्याची शक्यता

दूध दरात घट: 22 सप्टेंबरपासून अमूल, मदर डेअरीचे दूध स्वस्त.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

दोन्ही मोठ्या ब्रँड्सनी दूध दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारनं पॅकेज्ड दूधावरील 5 टक्के जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जीएसटी परिषदेनेही त्यास मान्यता दिली

अमूल आणि मदर डेअरीकडून दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. या दोन्ही मोठ्या ब्रँड्सनी दूध दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं पॅकेज्ड दूधावरील 5 टक्के जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जीएसटी परिषदेनेही त्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे 22 सप्टेंबरपासून अमूल आणि मदर डेअरीचं दूध 3 ते 4 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.

सध्या अमूल गोल्ड या फुल क्रीम दुधाची किंमत प्रति लीटर 69 रुपये असून ती 65 ते 66 रुपयांपर्यंत येईल. अमूल फ्रेश टोंड मिल्क 57 रुपयांवरून 54 ते 55 रुपयांवर मिळणार आहे. अमूल टी स्पेशल दूध 63 रुपयांवरून 59 ते 60 रुपयांवर उपलब्ध होईल. म्हशीचं दूध 75 रुपयांवरून 71 ते 72 रुपयांवर, तर गायीचं दूध 58 रुपयांवरून 55 ते 57 रुपयांवर मिळणार आहे. मदर डेअरीच्या दुधाच्या किंमतींमध्येही तशीच कपात होणार आहे. फुल क्रीम दूध 69 रुपयांवरून 65 ते 66 रुपयांवर, टोन्ड मिल्क 57 रुपयांवरून 55 ते 56 रुपयांवर, म्हशीचं दूध 74 रुपयांवरून 71 रुपयांवर आणि गायीचं दूध 59 रुपयांवरून 56 ते 57 रुपयांवर येणार आहे.

महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दूध आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तू सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहाव्यात यासाठी जीएसटी स्लॅबमध्ये बदल केला आहे. आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोनच स्लॅब राहणार असून दूधावरील जीएसटी पूर्णपणे शून्यावर आणण्यात आला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांना थेट दिलासा मिळणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mutual Fund : म्युच्युअल फंडातील गडगडाट! ऑगस्टमध्ये गुंतवणुकीत मोठी घट

Latest Marathi News Update live : नगरपालिकेच्या हद्दीत मिळणार घरकुल योजनेचा लाभ ...

Ladki Bahin Yojana : महिला लाभार्थींना दिलासा, ऑगस्ट हप्त्याचा निधी अंतिम टप्प्यात

Crime : पैशासाठी माणुसकीला तिलांजली; जमिनीच्या वादामुळे दोन दिवस मृतदेह अडकला