ताज्या बातम्या

ATM New Rules : आजपासून ATM संदर्भातील 'हे' नियम बदलणार, जाणून घ्या

RBI कडून यासंबंधी गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

Published by : Shamal Sawant

आजपासून म्हणजे 1 मे 2025 पासून ATM संबंधित नवीन नियम लागू होणार आहेत. RBI कडून ATM मधून किती वेळा व्यवहार करु शकता आणि ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा व्यवहार केल्यास किती शुल्क भरावे लागेल? याबद्दल आता सविस्तर माहिती जाणून घेऊया. RBI कडून यासंबंधी गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

महानगरांमध्ये, तीन व्यवहार मोफत आहेत, तर नॉन-मेट्रो भागात, इतर बँकांच्या एटीएममधून पाच व्यवहार मोफत आहेत. निर्धारित मोफत व्यवहारांनंतर, ग्राहकांकडून जास्तीत जास्त 23 रुपये आकारले जाऊ शकतात आणि हे 1 मे 2025 पासून लागू होईल असे आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. महानगरांमध्ये राहणारे लोक इतर बँकांच्या एटीएममधून तीन मोफत व्यवहार करू शकतात, तर बिगर महानगरांमध्ये राहणारे लोक इतर बँकांच्या एटीएममधून पाच मोफत व्यवहार करू शकतात.

आजपासून, म्हणजे 1 मे 2025 पासून, जर तुम्ही एटीएमचा वापर निर्धारित मोफत मर्यादेपेक्षा जास्त केला तर तुमची बँक तुमच्याकडून २३ रुपयांपर्यंत शुल्क आकारू शकते, जे पूर्वी 21 रुपये होते. तुम्ही पैसे काढत असाल किंवा तुमची शिल्लक तपासत असाल तरीही हा दर सर्व व्यवहारांवर लागू होईल. हे शुल्क कॅश रिसायकलर मशीनवर देखील लागू असेल, तथापि, पैसे जमा करण्यावर हे शुल्क लागू होणार नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा